MARATHI VARNAMALA | मराठी व्याकरण
वर्णमाला / मुळाक्षरे
मराठी भाषेतील
वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहेत.
स्वर -12
स्वरादी - 02
व्यंजन -34
स्वर
‘‘ ओठांचा
एकमेकाशी किंवा जिभेचा मुखातील कोणताही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी
बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात.’’
स्वरांचे प्रकार
-हस्व
स्वर
ज्यांचा उच्चार
आखुड असतो किंवा ज्यांना उच्चारण्यास कमी वेळ लागतो त्यांना -हस्व स्वर म्हणतात.
उदा. अ,इ,उ,ऋ,लृ
दिर्घ स्वर
ज्यांचा उच्चार
लांबट होतो किंवा ज्यांना उच्चारण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दिर्घ स्वर असे
म्हणतात.
उदा. आ,ई,ऊ
संयुक्त स्वर
जे स्वर इतर दोन
स्वरांचे मिळून बनलेले असतात त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
उदा. ए,ऐ,ओ,औ
सजातीय स्वर
एकांच उच्चार
स्थानतून निघणा-या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ
विजातीय स्वर
भिन्न उच्चार
स्थांनातून निघणा-या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ-इ,अ-उ,उ-ई,इ-ऊ
नवे स्वर
इग्रजीतून मराठी
आलेले स्वर
उदा. अॅ,आॅ
स्वरादी
अं व अः
अनुस्वार व विसर्ग या दोन वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी एखादया स्वराचा उच्चार
करावा लागतो म्हणून ज्याचा आधी स्वर आहे त्याला स्वरादी असे म्हणतात.
उदा.अं,अः
व्यंजन
ज्या वर्णाचा
उच्चार करतांना जिभेचा तोडातील इतर अवयवाना स्पर्श होतो व शेवटी स्वरांचे सहाय्य
घ्यावे लागते त्या वर्णानां व्यजंन असे म्हणतात.
व्यंजनाचे
प्रकार
स्पर्श व्यंजने
स्पर्श व्यंजने
एकूण 25
आहेत.
कठोर व्यंजने
ज्यांचा उच्चार
करावयास कठिण असतो त्यांना कठोर व्यंजने म्हणतात.
उदा. क्,ख्,च्,छ्,ट्,ठ्,त्,थ्,प्,फ्
मृदू व्यंजने
ज्यांचा उच्चार
करावयास सोपा असतो त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात.
उदा. ग्,घ्,ज्,झ्,ड्,ढ्,द्,ध्,ब्,भ्
अनुनासिक/ पर
सवर्ण
ज्यांचा उच्चार
नाकातून होतो त्यांना अनुनासिक असे म्हणतात.
उदा. ङ्,ण्,न्,म्,
अर्ध स्वर
य्,र्,ल्,व्,यांची उच्चार स्थाने
अनुक्रमे इ,ऋ,लृ,उ,
या स्वराच्या उच्चार स्थाना सारखे असल्यामूळे त्यांना अर्ध स्वर असे
म्हणतात.
उष्मे / घर्षक -
ज्या वर्णानाचा
उच्चार करतांना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते त्यामुळे त्याना उष्मे किंवा घर्षक
असे म्हणतात.
उदा. श्,ष्,स्
महाप्राण -
ज्या वर्णाचा
उच्चार करतांना फुप्फूसांतील हवा तोंडातून जोराने बाहेर फेकली जाते. त्यांन
महाप्राण असे म्हणतात.
उदा. ह्
स्वतंत्र वर्ण -
‘ळ्’
हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो.
सयुक्त व्यंजने -
मराठीत क्ष् व
ज्ञ या व्यंजनाची सामावेश संयुक्त व्यंजनात करतात.